
सामना ऑनलाईन । कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी उत्पादन संघानं (गोकुळ) गायीच्या दूध खरेदी-विक्री दरात दोन रुपयांची कपात केली आहे. या निर्णयामुळे गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर ४४ रुपयांऐवजी फक्त ४२ रुपये मोजावे लागणार आहे. गाईच्या दुधाचे दर दोन रुपयाने कमी झाल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गोकुळने आपला दूध खरेदी दर २५ रुपयांवरून २३ रुपये केला आहे. त्यामुळे ग्राहकांना देखील त्याचा फायदा मिळणार आहे. मुंबईत या निर्णयाची अंमलबजावणी २१ जून पासून होणार आहे.


























































