
सामना ऑनलाईन, रत्नागिरीत
राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणूकीसाठी आज शातंतेत मतदान झाले. या निवडणुकीत ६८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सोमवारी १६ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी राजापूरात तिरंगी लढत असून शिवसेनेकडून अभय मेळेकर निवडणूक रिंगणात आहेत.
हनिफ काझी यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी राजापूरात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. शिवसेनेकडून अभय मेळेकर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून अॅड जमीर खलिफे, भाजपकडून गोविंद चव्हाण यंच्यात लढत आहे. राजापूर शहरामध्ये ७,५५१ मतदार आहेत. त्यामध्ये ३,८४८ महिला आणि ३,७०३ पुरुष मतदार आहेत. पावसाचा मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून आले. मतदानासाठी ५५ कर्मचारी तैनात ठेवण्यात होते. सोमवारी सकाळी १० वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृहात मतमोजणीस सुरूवात होईल.


























































