मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गोंधळ घालणार्‍या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना 

मुख्यमंत्र्याच्या ताफ्यामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्याच्या करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये ३-४ कार्यकर्त्यांना मार लागला असून त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुष्काळी कामाचा आढावा घेण्यासाठी जालन्यात आले होते. हेलीपॅड वरुन जिल्हाधिकारी कार्यालयात  बैठकीसाठी जात असताना त्यांच्या ताफ्यात घुसण्याचा काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु कार्यकर्त्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी लाठी चार्ज केला.