
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
गुरू नानक जयंतीच्या एक दिवसापूर्वी केंद्र सरकारने शीख धर्मियांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. करतारपूर साहिब कॉरिडरच्या निर्मितीची घोषणा केंद्र सरकारने केली असून यामुळे शीख धर्मियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. हा कॉरिडॉर पंजाब मधील गुरूदासपूरमधून सुरू होऊन पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत असेल. यासाठी केंद्र सरकार निधी देणार असून या कॉरिडरमध्ये अत्याधूनिक सेवांचा समावेश असणार आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा आहे.
In landmark decision, the Cabinet approves building and development of Kartarpur corridor from Dera Baba Nanak in Gurdaspur district to International Border. Kartarpur corridor project with all modern amenities and facilities to be implemented with Central Government funding.
— राजनाथ सिंह (@rajnathsingh) November 22, 2018
हिंदुस्थान सरकार गुरूनानक देव यांची ५५०वी जयंती जागतिक स्तरावर मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल अशी घोषणाही राजनाथ सिंह यांनी केली. गुरुद्वारा साहिब करतार पाकिस्तानमध्ये असून शीख धर्मियांमध्ये या ठिकाणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदुस्थानी शीख धर्मीय दुर्बिणीतून त्याचे दर्शन घेतात.
The States/UTs also being requested to celebrate 550th Birth Anniversary of Shri Guru Nanak Devji in a befitting manner. Indian missions overseas to organize special events on the occasion. UNESCO to be requested to publish Shri Guru Nanak Devji’s writings in world languages.
— राजनाथ सिंह (@rajnathsingh) November 22, 2018
या कॉरिडरची निर्मिती झाल्यास या पवित्र ठिकाणी जाण्यास शीख धर्मियांना सुलभ होईल. या कॉरिडॉरसाठी हिंदुस्थान पाकिस्तान सरकारशी चर्चा करणार असून पाकिस्तानच्या हद्दीतही अशा कॉरिडॉरच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील.






















































