ननने सांगितली आपबीती, पाद्रीने माझ्या छातीवर जबरदस्ती …

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केरळमध्ये पाद्रीने ननवर केलेल्या बलात्काराचे प्रकरण चांगलेच गाजले. यानंतर जगभरामध्ये ननवर झालेले अत्याचार आणि लैंगिक शोषणाची प्रकरणे समोर आली. हिंदुस्थानसह युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेतही ननवर झालेल्या अत्याचारांच्या कहान्यांही सर्वांचेच डोळे पाणावले. या प्रकरणांमध्ये सर्वाधिक आरोप कॅथलिक पाद्रीवर झाल्याचेही समोर आले.

‘फर्स्ट पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेने तोंड न उघडल्याने अनेक ननवर झालेल्या अत्याचारांचे गुन्हे समोर येत नाहीत. तसेच ननसोबत पाद्रींकडून होणाऱ्या गैरव्यवहाराच्या समस्या तर सामन्या आहेत. याच दरम्यान काही ननने आपल्यावर झालेल्या अत्याचारांच्या घटना नाव न सांगण्याच्या अटींवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंसमोर मांडल्या.

ननने सांगितले की, एका रात्री बिशप दारूच्या नशेत ननच्या खोलीत जबरदस्ती घुसला आणि तिला मिठी मारून जबरदस्ती चुंबन घेतले. यानंतर ननच्या आईने चर्चच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली परंतु त्यानंतरही पाद्रीला त्याचे सर्वाधिकार देण्यात आले.

दुसऱ्या एका ननने सांगितले की, मी नवीन असताना एक पाद्री कॅथलिक केंद्रात आला. तो गोव्यावरून आला होता. त्याने मला जबरदस्ती मिठी मारली आणि चुंबन घेऊ लागला. तसेच माझ्या छातीवर हात ठेऊन जबरदस्तीने चुंबन घेतले. यानंतर पीडित ननने चर्चाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, परंतु पुढे त्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आली.

यापूर्वी केरळच्या एका ननने सांगितले की, ‘माझ्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार सर्वात आधी मी चर्चच्या अधिकऱ्यांकडे केली. परंतु तेथून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.’ चर्चच्या अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने ननने पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार नोंदवली आणि 2 वर्षात 13 वेळा आपल्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले. यानंतर बिशपला अटक करण्यासाठी आंदोलनही झाले. यानंतर बिशपला अटकही झाली परंतु त्याची सुटकाही झाल्याने केरळमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.