
सामना ऑनलाईन । मेलबर्न
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत रविवारी धक्कादायक निकाल लागला. ग्रीसच्या 20 वर्षीय स्टेफानोस त्सित्सिफास याने सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम जिंकणाऱ्या रॉजर फेडररला 6-7, 7-6, 7-5, 7-6 अशा फरकाने हरवत त्याचे आव्हान संपुष्टात आणले. या पराभवामुळे सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याच्या रॉजर फेडररच्या आशांना सुरुंग लागला. स्टेफानोस त्सित्सिफास हा ग्रॅण्डस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा ग्रीसचा पहिलाच खेळाडू ठरलाय.


























































