राज्यवर्धन यांच्या विरोधात काँग्रेसचे ‘ऑलिम्पिक कार्ड’, थाळीफेकपटू पुनियाला उमेदवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rajyavardhan rathore krishna punia

सामना ऑनलाईन । जयपूर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत 325 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपचे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या विरोधात काँग्रेसकडून ऑलिम्पियन खेळाडू कृष्णा पुनियाला जयपूर ग्रामीणमध्ये लोकसभा उमेदवारी देण्यात आली आहे.

कृष्णा पुनियाने ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये थाळीफेक प्रकारात हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2010 साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत पुनियाने थाळीफेकमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.

कृष्णा पुनिया सध्या राजस्थानच्या सादुलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. कृष्णा पुनियाची थेट लढत राज्यवर्धन राठोड यांच्या बरोबर होणार आहे. ऑलिम्पिक पदक विजेते राज्यवर्धन राठोड केंद्र सरकारमध्ये क्रीडा व युवककल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) आहेत. ते जयपूर ग्रामीणचे खासदार आहेत. काँग्रेसने सोमवारी जाहीर केलेल्या यादीमध्ये सहा राजस्थानचे, दोन महाराष्ट्र आणि एक गुजरातचा उमेदवार आहे.