गेल्या पाच महिन्यात मुंबईत आढळले स्वाईन फ्लू 200 रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । मुंबई

जानेवारीपासून मुंबईत स्वाईन फ्लुचे 200 रुग्ण आढळले आहेत. 2016 नंतर 2019 मध्ये ही रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच मार्चमध्ये स्वाईन फ्लूमुखळे दोघांचा मृत्यू झाला होता.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. मार्चमध्ये रुग्णांची संख्या 85 होती ती एप्रिलमध्ये ती 4७7वर आली तर मे मध्ये कमी होऊन रुग्णसंख्या 29 झाली आहे. फेब्रुवारीमध्ये स्वाईन फ्लुचे 39 रुग्ण आढळल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

वातावरण बदलल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच रुग्णांवर योग्य ते उपचार केल्याने अनेक रुग्ण बरे झाले आहेत, यात कुठली काळजी करण्याचे कारण नाही असेही डॉक्टरांनी सांगितले.

मुंबईत पावसाळ्यानंतर आणि हिवाळ्यात H1N1 चा विषाणू पसरतो. जसजशी थंडी वाढते तसाच हा विषाणू पसरतो. 2015 मध्ये संपूर्ण देशभरात स्वाईन फ्लूचा विषाणू पसरला होता तेव्हा मुंबईत 1 हजार 815 रुग्ण आढळले होते तर 19 जणांचा मृत्यू झाला होता.

स्वाईन फ्लुची सर्वाधिक लागण ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गरोदर महिलांना झाली आहे. यासाठी सव्वा लाखहून अधिक लसींचा पुरवठा मुंबईतील इस्पितळात केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ पी आवटे यांनी दिली आहे.

गेल्या वर्षी एक लाख 55 हजार रुग्णांना लसी देऊन स्वाईन फ्लूपासून बरे केले होते. अशक्तपणा, ताप येणे, डोके दुखणे, खोकला ही स्वाईन फ्लुची लक्षणे आहेत. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ति कमी असते त्यांना या फ्लूची पटकन लागू होते.