परळी- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेची तहसील कार्यालयावर निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला असून त्या नुकसानीची भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

parli

शेतकऱ्यांच्या पाठीशी असणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख आनंद जाधव, जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी, बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 25 हजार नुकसानीची भरपाई द्यावी, कसलेही निकष न लावता सरसकट विमा वाटप करण्यात यावा, शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ करावे, शेतकऱ्यांच्या पाल्ल्याना शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी बी-बियाणे मोफत वाटप करावे या मागण्यासाठी परळी तालुका शिवसेनेच्या वतीने निदर्शने करून निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख राजेश विभूते, जिल्हा सहसंघटक रमेश चौंडे, युवासेना तालुका समन्वयक संतोष चौधरी,उपशहर प्रमुख मोहन राजमाने,युवा शहर अधिकारी कृष्णा सुरवसे, उपतालुका प्रमुख पप्पू नाटकर, विध्यार्थी सेना शहर संघटक गजानन कोकीळ यांच्यासह असंख्य शिवसैनिक या निदर्शनात सहभागी झाले होते.

बीड – शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार मदत द्या, शिवसेनेची निदर्शने