नोटबंदीला तीन वर्षे उलटूनही देशात बनावट नोटांचा सुळसुळाट असल्याचे गुजरातमध्ये सापडलेल्या नोटांच्या आकडय़ांवरून दिसत आहे. या नोटांची किंमत 9 कोटींपेक्षा जास्त आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने नोटबंदीनंतर बनावट नोटांची दखल त्यांच्या अहवालातून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार 2017 मध्ये 28.1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत . 2016 मध्ये जप्त करण्यात आलेल्या नोटांच्या तुलनेत हा आकडा 76 टक्क्यांनी जास्त आहे. तेव्हा 15.9 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते.
सरकारी आकडेवारीनुसार, गुजरात बनावट नोटांचा अड्डाच बनला आहे. देशभरात 2017 मध्ये जप्त केलेल्या बनावट नोटांपैकी 32 टक्के नोटा एकटय़ा गुजरातमधून होत्या. नकली नोटांमध्ये दिल्ली दुसर्या क्रमांकावर आहे. देशात 50 टक्क्यांपेक्षा नकली नोटा गुजरात आणि दिल्ली या दोन राज्यांतून जप्त करण्यात आल्या आहेत.
राज्य नोटांची संख्या किंमत
गुजरात 80519 9 कोटी
दिल्ली 1.08 लाख 6.79 कोटी
उत्तरप्रदेश 28318 2.86 कोटी
पश्चिम बंगाल 14770 1.93 कोटी
केरळ 18498 1.30 कोटी
आंध्रप्रदेश 33047 1.2 कोटी
नोट संख्या
2000 74898
1000 65731
500 (जुन्या) 1.02लाख
500 (नवीन) 8879
100 92778
50 (जुन्या) 3347
50 (नवीन) 155
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल
2017 मध्ये जप्त केलेल्या नकली नोटांमध्ये पाचशे रुपयांच्या नोटा सर्वाधिक आहे. दोन हजार रुपयांच्या 74, 878 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत 14.97 कोटी एवढी आहे. याशिवाय एक हजार रुपयांच्या नकली नोटा असून त्यांची किंमत 6.57 कोटी रुपये एवढी आहे.























































