
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्याच्या प्रचारात सत्ताधारी एनडीएच्या सीएए आणि एनआरसीबाबतच्या धोरणातील ‘कन्फ्यूजन’ अधिकच उघड झाले आहे. कटिहारमधील प्रचार सभेत भाजपचे फायरब्रॅण्ड नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीएए व एनआरसीचे समर्थन करताना राज्यात पुन्हा एनडीएचे सरकार आले तर घुसखोरांना राज्यातून बाहेर काढू असा हुंकार भरला आहे. मात्र मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी किशनगंजमधील प्रचार रॅलीत या देशाचे नागरिक असलेल्यांना राज्यातून बाहेर काढायला कुणाची माय व्यायली आहे, असे आव्हान नव्या नियमान्वये घुसखोरांना बाहेर काढण्याची घोषणा करणाऱया आपल्याच मित्रपक्षाला अप्रत्यक्षरीत्या भाजपला दिले आहे. अखेरच्या टप्प्यातील या मित्रपक्षांतील मतभेदांमुळे 78 जागांवरील मतदान जेडीयू आणि भाजपसाठी अग्निपरीक्षाच ठरणार आहे.
कटिहारमध्ये तिसऱया टप्प्याच्या निवडणूक प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी बिहारमध्ये पुन्हा एनडीए सत्तेवर आल्यास कटिहारसह बिहारच्या अन्य भागांतील घुसखोरीची समस्या प्रामुख्याने सोडवू. राज्यातील भूमिपुत्राला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही एक एक करून राज्यात घुसखोरी करणाऱया नागरिकाला बाहेर काढू असे आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी मतदारांना दिले. ते भाजप उमेदवार तार किशोर यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
z कुणात दम आहे राज्याच्या नागरिकांना बाहेर काढण्याचा -नितीश
सीएए आणि एनआरसीवरून काही राजकारणी बिहारमधील नागरिकांत भय निर्माण करीत आहेत. या राज्याच्या आणि देशाच्या वैध नागरिकांना बिहारमधून आणि देशातून बाहेर काढायला कुणाची माय व्यायली आहे ते आम्ही बघणार आहोत, असे आश्वासन देत मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले, आम्ही सत्तेत असलो की कुणावरही राज्यातून बाहेर जाण्याची केळ येणार नाहीय. नितीशकुमार किशनगंजच्या कोचधामन या मुस्लिमबहुल मतदारसंघातील प्रचार सभेत बोलत होते. त्यामुळे नितीश यांनी सीएए आणि एनआरसीवरून मुस्लिम समाजाचा बुद्धिभेद करणारे एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या मतदारसंघात जेडीयूकडून विद्यमान आमदार मुजाहिद आलम, आरजेडीकडून शाहीद आलम आणि एआयएमएमकडून मोहम्मद इजहार निकडणूक मैदानात आहेत.





















































