
फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने मिळून 3 लाख 78 हजारांचा ऐवज चोरून नेला. त्याशिवाय शेजारील फ्लॅटमध्येही घरफोडीचा प्रयत्न केला. ही घटना दोन दिवसांपुर्वी मध्यरात्री लोहगावमधील साठेवस्तीवर घडली. याप्रकरणी पवन मेंगडे (वय 32) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी पवन लोहगावमधील आरपीएस टॉवरमध्ये राहायला आहेत. ते कुटूंबियासह 19 मार्चला बाहेरगावी गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील 3 लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा 3 लाख 78 हजारांचा ऐवज चोरून नेला. त्याशिवाय चोरट्यांनी सोसायटीतील दुसऱ्या फ्लॅटमध्येही घरफोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गिरी तपास करीत आहेत.
सेंटरिंग बांधकामाच्या प्लेट्स चोरीला
पुणे- इमारत बांधकामावेळी वापरण्यात येणाऱ्या 1 लाख रूपये किंमतीच्या 100 लोखंडी सेंटरिंग प्लेट्स चोरून नेण्याची घटना लोहगावमध्ये घडली आहे. याप्रकरणी दीनेश गोस्वामी (वय 38) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

























































