
इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांना करिअरसाठी आणखी एक पर्याय मिळावा यासाठी पवई येथील आयआयटी मुंबईने पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी दुहेरी पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे. इंजिनीयरिंग करणारे विद्यार्थी संस्थेच्याच शैलेश मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवस्थापन अभ्यासक्रमही करू शकणार आहेत. तृतीय वर्ष बी.टेक आणि बीएस अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या दुहेरी पदवी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरणार आहेत.
2021-22 या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू केला जात आहे. पॅम्पस प्लेसमेंटमध्ये येणाऱया अनेक पंपन्यांकडून इंजिनीयरिंग आणि मॅनेजमेंट अशी दुहेरी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांची मागणी होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी बी.टेक केल्यानंतर दोन वर्षे एमबीए अभ्यासक्रमही करतात. शैलेश जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये सुरू करण्यात येणाऱया या अभ्यासक्रमात सुरुवातीला फायनान्स आणि ऑपरेशन्स या दोन शाखांमध्ये प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तृतीय वर्ष बी. टेक, बीएस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा आलेख पाहून त्यांची पात्रता नाश्चित केली जाईल आणि त्यानंतर त्यांची प्रत्यक्ष मुलाखतही घेतली जाईल.
भविष्यात मार्केटिंग आणि एचआर सारखे अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा आयआयटी मुंबईचा मानस आहे. प्राध्यापकांची उपलब्धता पाहून त्याचा निर्णय घेतला जाणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या जागाही वाढवल्या जाणार आहेत अशी माहिती आयआयटी मुंबईतील वरिष्ठ प्राध्यापकांनी दिली.

























































