ऑक्सिजनचा पुरवठा फक्त हॉस्पिटललाच करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात तयार होणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा फक्त रुग्णालयांनाच करावा. खासगी व्यक्तींना दिल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत.

नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजन बेडवर असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्यामुळे मेडिकल ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. मेडिकल ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीमुळे आणि रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील लिक्विड ऑक्सिजन उत्पादन / रिफीलर यांनी 100 टक्के साठा वैद्यकीय कारणासाठी विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खासगी व्यक्तींना ऑक्सिजनचा पुरवठा करू नये, असेही जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आदेशात म्हटले आहे.