पुणे – कपडे वाळवताना आठव्या मजल्यावरुन पडून महिला ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कपडे वाळत घालत असताना इमारतीच्या आठव्या मजल्यावरच्या गॅलरीतून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी जांभूळवाडीत घडली. पित्रादेवी हरिजी सिंग (वय 56,रा. लेकवृड सोसायटी, जांभूळवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पित्रादेवी सुनेसह आठव्या मजल्यावर राहत होत्या. त्यांच्या पतीवर मुंबईत उपचार सुरु असल्याने मुलगा मुंबईत राहतो. दरम्यान, आज सकाळी साडेसातच्या सुमारास गॅलरीत स्टुलवर उभ्या राहून पित्रादेवी कपडे वाळत घालत होत्या. त्यावेळी स्टुलवरून तोल जाऊन त्या थेट खाली पडल्या. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.