लहान मुलांना माती खायला का आवडते? जाणून घ्या…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही-आम्ही सर्वांनीच लहानपणी माती खाल्ली आहे. सर्वच लहान मुलांना माती खाणे आवडते. पण का? यांचे उत्तर आपल्याला त्यांचा आहार व वाढत्या वयातील त्यांच्या शरीराच्या बदलत्या गरजा कारण असतात.

लहान मुलांना विषेशत: दात येताना, शरीराच्या गरजा मोठ्या प्रमाणात बदलतात. त्यांना त्या विशिष्ट वयात गरज असते कॅल्शियम या क्षाराची. ही शारीरिक गरज असते. मानसिक नाही. जसे गर्भवतींना अधिक आहार लागतो तसेच हे असते. (गर्भारपणी स्त्री ही दोन जिवांना पोसत असते – स्वत:ला व आपल्या उदरातील वाढत्या अर्भकाला). स्वाभाविकच तिला अधिक भूक लागते. कित्येक स्त्रियांना उलट्याचा त्राास होतो. परंतु तरीही त्या थोड्याच वेळाने परत जेवायला बसलेल्या पाहतो. यात काहीही अनैसर्गिक नसते.

गर्भवाशिणीची भूक वाढते व तिला आहार घ्यावाच लागतो. हे जसे नैसर्गिक असते तशीच नैसर्गिक असते तान्हुल्यांची कॅल्शियमची गरज. जर त्यांना आहारातून पुरेसे कॅल्शियम मिळाले नाही तर ते आपणहून शोधायला लागतात.

हा एक प्रकारचा अॅनिमल इन्स्टिक्ट म्हणायला हवा. निरनिराळ्या गोष्टी मग तोंडात जातात. चमचे जातात, खेळणी जातात. एवढेच काय तर ते मातीसुद्धा चाखुन पहातात. आणि इथेच त्यांचा हा शोध संपतो! त्यांना हवे ते कॅल्शियम त्याना नेमके मातीत सापडते. आणि आपला शोध पूर्ण झाल्याचे त्यांना वासावरून व चवीनधून कळते!

आपण चिमुरड्यांना लहान समजतो पण ती खर्या अर्थाने आपली बाप असतात. हवी ती गोष्ट ते नेमकी शोधून काढतात. गरज ही शोधाची जननी, दुसरे काय? परंतु ज्या मुलांना संतुलित आहार मिळतो ती मुले काही माती खात नाहीत. म्हणूनच बालकांच्या आहाराकडे आई वडिलांनी नीट लक्ष दिले पाहिजे. ‘Quora’ या संकेतस्थळावर विचारलेल्या प्रश्नाला नंदकुमार सांगलीकर यांनी हे उत्तर दिले आहे.