ग्रंथालीच्या ‘बखर घारापुरीची’ पुस्तकाचे प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घारापुरी लेण्यांच्या इतिहासावर नवा प्रकाश पाडणारे ‘बखर घारापुरीची’ हे पुस्तक नुकतेच ग्रंथाली प्रकाशनाकडून प्रकाशित करण्यात आले. पुरातत्व विषयावर ग्रंथालीचे हे पाचवे पुस्तक आहे.

ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांनी या पुस्तकावर संपादकीय संस्कार केले असून मुखपृष्ठ आदित्य लाड यांनी केले आहे. महाराष्ट्रात काही हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या राजवटींबद्दलची माहिती नाण्यांमधून व खापराच्या तुकड्यांतून कशी दडलेली आहे याची झलक या पुस्तकातून मिळते. लाड यांनी घारापुरी बेटावर घडलेला इतिहास सोप्या भाषेत, आकृत्या व छायाचित्रांच्या मदतीने उलगडला आहे. लाड यांच्या प्रथम स्मृतिदिनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध नाणकतज्ञ डॉ. दिलीप राजगोर, गॅझेटियर विभागाचे एक्झिक्युटिव्ह एडिटर, पुरातत्व अभ्यासक डॉ. दिलीप बालसेकर आदी उपस्थित होते.