वैद्य संतोष नेवपूरकर केंद्राच्या आयुर्वेद औषधी सल्लागार मंडळावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातील आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिध्द तथा होमिओपॅथी विभागाच्या वतीने ११ एप्रिल रोजी एक आयुर्वेदिक, सिध्द आणि युनानी औषधी सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली असून या मंडळावर संभाजीनगरातील जेष्ठ आयर्वेदतज्ज्ञ वैद्य संतोष नेवपूरकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य महानिदेशक हे या समितीचे पदसिध्द अध्यक्ष असून आयुष मंत्रालयातील औषधी सल्लागार हे या समितीचे पदसिध्द सचिव असतील. समितीत एकुण 20 सदस्य आहेत. त्यात औषधी महानिदेशक, केंद्रीय प्रयोगशाळा निदेशक, होमिओपॅथी आयोगाचे सरकारी विस्लेषक, चिकित्सा अनुसंधान परिषदेचे शास्त्रज्ञ डॉ. निरज टंडन, जैव संसाधन विकास संस्थानचे निदेशक डॉ. पुलक के मुखर्जी, कर्नाटकातील आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉ. प्रकाश हेगडे, कोलकत्ताचे डॉ. सी के कटियार, अलीगढचे प्रो. ताजुद्दीन, चेन्नईचे डॉ. जी वेलुचामी, जयपुरचे डॉ. सुमित नथानी, अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे डॉ. एफ एस शेरनानी, चेन्नईचे डॉ. एम कृष्णवेणी, गुजरातचे डॉ. लाल हिंगोरानी, तामिळनाडूचे डॉ. एल शिवकुमार, हमदर्द नेशनल फाऊंडेशनचे डॉ. असद मुईद, संभाजीनगरचे वैद्य संतोष नेवपूरकर, चेन्नईचे डॉ. पी. सेल्वा शुनमुगम आणि उत्तरप्रदेशातील डॉ. सबाहत उल्ला यांचा समावेश आहे