
मेक इन इंडियाअंतर्गत हिंदुस्थानचे हवाई दल देशात तब्बल 100 फायटर जेट बनवणार आहे. त्याबाबतची योजना आखत आहे. तसेच जागतिक पातळीवरील विमान उत्पादक कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. शंभर फायटर जेट बनवण्याच्या प्रोजेक्टचे जवळपास 70 टक्के पैसे हिंदुस्थानी चलनाद्वारे दिले जाणार आहे.
या योजनेंतर्गत प्रत्यक्षात एकूण 114 विमाने खरेदी केली जाणार आहेत. त्यामुळे हवाई दलाची क्षमता वाढणार असून मिग सीरिजची विमानेही बदलली जातील. या प्रोजेक्टमधील सुरुवातीची 18 विमाने परेदेशी व्हेंडर्सकडून घेतली जातील. तर इतर विमानांच्या निर्मितीसाठी स्पर्धात्मक पद्धतीने विमानांची चचणी घेऊनच पंपनीची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेत बोइंग, लॉकहीड, मार्टिन, एमआयजी, डसॉल्ट आणि साबसारख्या अनेक पंपन्या सहभागी होणार आहेत. सदरचा प्रोजेक्ट अगामी तीन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.






























































