
सोशल मीडियावर अमली पदार्थांची विक्री प्रकरणातील फरार आरोपीला अमली पदार्थ विरोधी पथकाने डेक्कन जिमखाना भागात पकडले. त्याच्याकडून चरस, गांजा असे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
स्वप्नील विकास बनसोडे (वय – 28, रा. बीएमसीसी रस्ता, डेक्कन जिमखाना) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर अमली पदार्थ विक्रीचा प्रकार उघडकीस आणला होता. या प्रकरणात पोलिसांनी दाेन तस्कराना पकडले होते. त्यांच्याकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. याप्रकरणात आरोपी बनसोडे पसार झाला होता. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. या प्रकरणी बनसोडेला डेक्कन जिमखाना भागातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन किलो गांजा, 30 ग्रॅम चरस, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, सुजीत वाडेकर, मनोज साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, विशाल दळवी यांनी केली
























































