
गुजरातमधील पायाभूत सुविधांसाठी 12 हजार 600 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. अहमदाबाद-धोलेरा द्रुतगती महामार्गाची नितीन गडकरी यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. वार्षिक योजनांच्या अंतर्गत गुजरातला 2600 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देऊ. राज्य महामार्ग, स्थानिक रस्ते बांधण्यासाठी 3 हजार कोटी रुपये तर सेतू बंधन योजनेसाठी 1 हजार कोटी रुपये दिले जातील. मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कसाठी 6 हजार कोटी रुपयांची तरतूद करणार आहोत, असे गडकरी म्हणाले.























































