
मी कर्नाटकच्या मतदारांना, जनतेला सलाम करते. आता छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या निवडणुका येत आहेत. मला वाटतं, आता भाजपचा या दोन्ही राज्यांत पराभव होईल. ही 2024 ची सुरुवात आहे. आता भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत अगदी 100 जागा मिळतील असंही वाटत नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.


























































