
कॉलेजजीवनात कलागुणांना वाव देण्यासाठी युवा महोत्सव हे मोठे व्यासपीठ असते. असाच एक रंगतदार कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अमृतवाहिनी इंजिनीअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत कला मंच येथे ‘स्वररंग-2023’ हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमात पुणे, नगर व नाशिक जिह्यांतील पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमातील 29 कलाप्रकारांमध्ये समूहगीत, हिंदुस्थानी समूह गायन, शास्त्रीय गायन, उपशास्त्र्ााrय गायन, स्वरवाद्यवादन, तालवाद्यवादन, पाश्चिमात्य वैयक्तिक गीत, पाश्चिमात्य समूह गायन, लोकवाद्यवृंद, वैयक्तिक नृत्य, संकल्पना नृत्य, लोकनृत्य, शास्त्र्ााrय नृत्य, एकपात्री अभिनय, एकांकिका, प्रहसन, मूकनाटय़, नकला, प्रश्नमंजूषा, वकृत्व स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा, स्थलचित्र, चिकट कला, कात्रण कला, पोस्टर मेकिंग, माती कला, व्यंगचित्र, रांगोळी, मेहंदी स्थळ, छायाचित्र मांडणी यामध्ये 700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यामध्ये नौरसजी वाडिया पुणे यांना विजेते, तर केटीएचएम महाविद्यालय नाशिक यांना उपविजेतेपद मिळाले. प्रा. डॉ. एम. ए. वेंकटेश यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पुणे विद्यापीठाचे डॉ. अभिजित कुलकर्णी, सदानंद भोसले, अनिल शिंदे, डॉ. रमेश पावशे आदी उपस्थित होते.


























































