1 जुलैपासून क्रेडिट कार्डच्या नियमात बदल, एचडीएफसी, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँकेचा समावेश

1 जुलैपासून क्रेडिट कार्डच्या नियमात बदल केले जाणार आहेत. यामध्ये एसबीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँकेचा समावेश आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना 1 जुलै 2025 पासून जोरदार झटका बसणार आहे. ट्रान्झॅक्शन चार्ज आणि रिवॉर्ड पॉलिसीमध्ये अनेक बदल केला जाणार आहे. याचा थेट परिणाम युजर्सच्या ऑनलाईन गेमिंग, वॉलेट रिचार्ज आणि युटिलिटी बिल पेमेंटवर येणार आहे. ऑनलाइन गेमिंगवर चार्ज, वॉलेट लोडिंगवर चार्ज, युटिलिटी बिल पेमेंटवर चार्ज आकारले जाणार आहे. एसबीआय येत्या 15 जुलैपासून क्रेडिट कार्डच्या नियमात बदल करणार आहे. आता ग्राहकांना विमान दुर्घटना विमा कव्हर मिळणार नाही. कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडिट कार्डचे नियम 10 जुलैपासून बदलणार आहे. कोटक बँकेने मिंत्रा कोटक क्रेडिट कार्डला बंद करण्याची घोषणा केली आहे.