
जम्मू-कश्मीरमधील राजौरी आणि पूंछ या दोन जिह्यांत प्रशासनाने इंटरनेट आणि व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) वर दोन महिन्यांसाठी बंदी घातली आहे. या जिह्यांत होत असलेला गैरवापर आणि बेकायदेशीर कारवाया ध्यानात ठेवून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पूंछ जिह्यातील न्यायदंडाधिकारी अशोक कुमार वर्मा यांनी कलम 163 अंतर्गत हा आदेश दिला आहे, तर राजौरी जिह्यातील न्यायदंडाधिकारी अभिषेक शर्मा यांनी यासंबंधी आदेश जारी केला आहे. व्हीपीएन ट्रफिक एन्क्रिप्टेड आहे. हा आयपी अॅड्रेस लपवतो.


























































