Photo – ट्रेडिशनल लूकमध्ये पलक तिवारीचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिच्या फॅशन सेन्स चाहत्यांना प्रचंड आवडतो. नुकतेच तिने इंस्टाग्रावर ट्रेडिशनल आउटफिटमध्ये फोटो शेअर केले आहेत.

नुकतेच पलकने तिच्या मैत्रिणीच्या हळदी समारंभाला हजेरी लावली. या कार्यक्रमातील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मैत्रिणीच्या हळदी समारंभासाठी पलकने सी ग्रीन कलरच्या डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे. यासोबतच लूकला शोभेल असा मिनीमल मेकअपही केला आहे.

सोशल मीडियावर पलकचा ट्रेडिशनल लूक सर्वांना आवडता असून चाहते तिच्या फोटोंचे कौतुक करताना दिसत आहेत.