
कधी आभाळ तर कधी कडक उन अशा उनसावलीच्या खेळामुळे नागरिक बेजार झाले असून आजारपण वाढले आहे. कुलाबा येथील वेधशाळेने जालना जिल्ह्यात 16, 17 आणि 18 एप्रिल असे तीन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आज जालनातील तापमान 41 अंश सेल्सिअसवर गेले.
उन्हामुळे बाजारपेठेतील व्यवहार थंडावले असून रस्ते सुनसान दिसत आहे. या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानेही जिल्ह्यातील नागरिकांना या काळात दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हात फिरतांना काय करावे आणि काय नाही, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आल्या आहे. या काळात नागरिकांनी
पुरेशी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक काजळकर यांनी केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच आरोग्य विभागाशी किंवा जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
मागील पंधरा दिवसांचे तापमान
1 एप्रिल – 22.0 (34.0)
2 एप्रिल – 19.0 (36.0)
3 एप्रिल – 21.5 (36.9)
4 एप्रिल – 22.7 (38.0)
5 एप्रिल – 22.7 (38.7)
6 एप्रिल – 22.8 (37.0)
7 एप्रिल – 21.4 (37.1)
8 एप्रिल – 22.0 (38.03)
9 एप्रिल – 22.6 (39.0)
10 एप्रिल – 22.8 (37.1)
11 एप्रिल – 23.5 (38.4)
12 एप्रिल – 23.4 (39.3)
13 एप्रिल – 23.2 (40.0)
14 एप्रिल – 23.4 (40.1)
15 एप्रिल – 24.0 (40.6)
16 एप्रिल – 24.03 (41.0)



























































