बिग बॉस मराठीचा महाफिनाले, 19 एप्रिलला जाहीर होणार विजेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बॉस मराठीचे यंदाचे सिझन हे आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. राकेश बापट, अनुश्री माने, तन्वी कोलते, दीपाली सय्यद आणि विशाल कोटियन या पाच जणांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. येत्या 19 एप्रिलला बिग बॉस मराठी 6 चा महाफिनाले पार पडणार आहे.

ग्रँड फिनालेचं काऊंटडाऊन सुरू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, कोण होणार विजेता हे १९ तारखेला अखेर ठरणार आहे या सीझनचा कोण विजेता होणार आणि ‘बिग बॉस मराठी’च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राखी सावंत आणि रेवा कौरासे यांना फायनलच्या काही दिवस आधी घरातून बाहेर पडावे लागले. राखी व रेवा या दोघींनीही या सिझनमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री केली होती.

कोण मारणार बाजी ?

राकेश बापट, अनुश्री माने, तन्वी कोलते, दीपाली सय्यद आणि विशाल कोटियन या पैकी कुणाचे पारडे जड आहे यावर सध्या जोरदार चर्चा आहे. राकेश बापट व तन्वी कोलते हे सध्या या ट्रेंडमध्ये टॉपवर आहेत.