हे करून पहा – स्वयंपाक घरातील मुंग्या होतील गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा जवळ आला की अन्नाच्या शोधात काळ्या आणि लाल मुंग्या बाहेर पडतात. प्रत्येक घराच्या कानाकोपऱ्यात या मुंग्या शिरकाव करतात. साखरेचा डबा, कडधान्य, चपाती, भात आणि गोड पदार्थांवर या मुंग्या ताव मारतात.

मुंग्यांना पळवून लावण्यासाठी घरातील अन्न उघडय़ावर ठेवू नका. मुंग्या प्रवेश करणाऱया कोपऱयांमध्ये थोडीशी साखर ठेवा.

मुंग्यांच्या वाटेवर मीठ किंवा हळद शिंपडल्यास त्या पुढे येत नाहीत. लादी पुसताना पाण्यात थोडं मीठ किंवा फिनाईल घाला किंवा घरातील कोपऱयांवर कापूरच्या वडय़ा ठेवल्याने मुंग्या दूर राहतात.