असं झालं तर… उष्णतेमुळे फ्रीज गरम होतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 वाढत्या उष्णतेमुळे घरातील फ्रीज गरम होत असेल तर थोडासा निष्काळजीपणाही मोठे नुकसान करू शकतो. फ्रीजमधील कॉम्प्रेसरवर ताण येऊन त्याचा स्फोट होऊ शकतो.

2 फ्रीज भिंतीला चिकटवून ठेवणे किंवा त्यात अतिप्रमाणात गरम वस्तू ठेवणे टाळावे. फ्रीजच्या मागे किमान 5 ते 6 इंच जागा मोकळी असावी.

3 घरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असेल किंवा व्होल्टेज वर-खाली होत असेल तर स्टॅबिलायझरचा वापर करा. प्लगमधून करंट बाहेर आला तर ते इलेक्ट्रिशियनला दाखवा.

4 प्रत्येक ऋतूत एकाच सेटिंगवर फ्रीज चालवणे योग्य नाही. उन्हाळ्यात तापमान थोडे थंड ठेवा, तर हिवाळ्यात ते कमी ठेवा. तापमान कमी ठेवल्यामुळे कॉम्प्रेसरवरील दाब वाढतो.

5 जे लोक फक्त उन्हाळ्यातच फ्रीज चालू करतात, त्यांनी सर्वात आधी वायर कापली किंवा जळली आहे का? उंदराने पुरतडली आहे का हे तपासावे.