छत्तीसगडमधील वीज प्रकल्पात स्फोट; 4 कामगारांचा मृत्यू, 15 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात मंगळवारी एका वीज प्रकल्पात झालेल्या भीषण स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. या अपघातात काही कामगार अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली आहे. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

शक्ती जिल्ह्यातील सिंगीतराई गावामध्ये वेदांता लिमिटेड कंपनीचा वीज प्रकल्प आहे. या वीज प्रकल्पामध्ये मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, प्रकल्पातील बॉयलर ट्यूबमध्ये हा स्फोट झाल्याचे कळते. या स्फोटामध्ये 4 कामगारांचा मृत्यू झाला आणि 15 जण जखमी झाले, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रफुल्ल ठाकूर यांनी दिली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनास्थळी काही कामगार अडकले असण्याची शक्यता असल्याने शोधमोहीम अजूनही सुरू आहे.