यशराजच्या आगामी चित्रपटात रणबीर कपूरच्या जागी अहान पांडेची एन्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘सैयारा’ या चित्रपटानंतर अहान पांडे पुन्हा एकदा मोहित सुरीसोबत आपल्याला दिसणार आहे. अनित आणि अहान पांडे या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यामुळे अहान आता पुढच्या कोणत्या चित्रपटामध्ये दिसणार याची त्याचे फॅन्स वाट पाहात होते. यशराज फिल्म सोबत रोमॅंटिक काॅमेडीमध्ये आता अहान दिसणार आहे. या चित्रपटामध्ये सुरुवातीला रणबीर कपूरचे नाव चर्चेमध्ये होते. परंतु आदित्य चोप्रा मात्र अहानच्या नावावर ठाम होता. त्यामुळे अहानच्या दृष्टीने आता पटकथेत बदल करून, लवकरच या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होणार आहे. मोहित सुरीने यापूर्वी रणबीर कपूरसोबत काम करण्याची आपली इच्छा व्यक्त केली होती. परंतु आदित्य चोप्राने मात्र अहान या नावावर शिक्कामोर्तब केले.

टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, अहानचा पुढील चित्रपट हा एक ‘ॲक्शन थ्रिलर’ असून त्यात तो एका ‘गँगस्टर’ची भूमिका साकारत आहे. अहान आता मोहित सोबत पुन्हा एकदा रोमॅंटिक काॅमेडीमध्ये दिसणार असल्यामुळे, त्याचे फॅन्सदेखील खुश झाले आहेत.

रणबीर कपूरनंतर या चित्रपटामध्ये अहानची वर्णी लागल्यानंतर, आता सर्वात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे पटकथेतील बदल. त्यामुळे पटकथेतील बदल करण्यासाठी आता टीम सज्ज झालेली आहे.