
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दिग्गज गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या निधनामुळे एका संपूर्ण युगाचा अंत झाल्याचे म्हटले आहे.
अमिताभ यांनी रविवारी आपल्या ब्लॉगवर नोट शेअर करत ‘ये मेरा दिल’, ‘तनहा तनहा’ आणि ‘दम मारो दम’ यांसारख्या अनेक गाण्यांना आवाज देणाऱया या महान गायिकेला श्रद्धांजली वाहिली. “दुःख आणि शोक… एक संपूर्ण युग… एक अविश्वसनीय, विलक्षण, अद्भुत, प्रतिभावान व्यक्तिमत्त्व… काल आपल्यातून निघून गेले… आयकॉनिक आशाजी आपल्यात नाहीत… आम्ही अत्यंत दुःखी आहोत,’’ असे बच्चन यांनी लिहिले.
“प्रत्येक गाण्याला त्यांनी दिलेला जिवंतपणा… आता त्या स्वर्गात गेल्या आहेत… आणि आपल्या मागे अमर संगीताचा संपूर्ण खजिना ठेवून गेल्या आहेत… त्यांचे शरीर आपल्यात नाही, पण त्यांचा आत्मा कायम आपल्या सोबत राहील… त्यांचा आवाज, आत्मा सदैव अमर राहील,’’ असे त्यांनी पुढे म्हटले.

























































