उच्च व तंत्रशिक्षण खात्याचा अजब कारभार, बाबासाहेबांचे नाव चुकवले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महायुती सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याला संविधानकारांचे नावच ठाऊक नाही. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला उच्च व तंत्रशिक्षण खात्याने एक जीआर काढला. त्यात बाबासाहेबांचे आडनाव ‘आंबेडकर’ऐवजी ‘आंबेडरकर’ असे टाकले गेले. डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या पुनर्गठनाबाबतचा हा जीआर उपसचिव मांडे यांनी काढला होता. या जीआरची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सरकारने यात सुधारणा केल्याचे समजते.