
गोरेगाव पूर्व येथील एका प्रदर्शन पेंद्रात आयोजित केलेल्या कॉन्सर्ट पार्टीत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यांनी अमली पदार्थाचे सेवन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घडल्या प्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा नोंद करून रात्री उशिरा 5 जणांना ताब्यात घेतले.
गोरेगाव पूर्व येथील प्रदर्शन पेंद्रात शनिवारी लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने तरुण-तरुणी उपस्थित होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणी ही तिच्या एका मित्रासोबत तेथे आली होती. तेथे काही तरुणांनी आणि विद्यार्थांनी मद्य सेवन आणि अमली पदार्थाचे सेवन केल्याचे समजते. त्याचा त्रास झाल्याने काहींना श्वास घेण्यास आणि चक्कर येण्यास सुरुवात झाली. दोन तरुणींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याची प्रकृती खालावल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले. एका तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसऱया तरुणीवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर आणखी एका तरुणाला त्रास सुरू झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वनराई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.


























































