असं झालं तर…ना सर्दी-खोकला, ना कफ; तरीही घसा खवखवतो?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  1. घसा खवखवणे म्हणजे सर्दी-खोकला, टॉन्सिल्स किंवा संसर्ग असेच समजले जाते, पण काही वेळा त्यामागे ‘सायलंट रिफ्लक्स’ हे कारण असू शकते.
  2. पोटातील ऑसिड घशापर्यंत पोहोचून सूज आणि अस्वस्थता निर्माण करते. ताप किंवा इतर लक्षणे नसतानाही हा त्रास दीर्घकाळ टिपू शकतो.
  3. घसा सतत कोरडा पडणे, सकाळी उठल्यावर आवाज बसणे आणि घशात कफ साचल्याची भावना होणे अशी लक्षणे आढळतात.
    रात्री जेवल्यानंतर किमान तीन तासांनी झोपायला जा. झोपताना डोक्याखाली उंच उशी घ्या, जेणेकरून ऑसिड वर येणार नाही.
  4. भरपूर पाणी प्या. अतितिखट, तळलेले, आंबट पदार्थ रात्रीच्या वेळी टाळा. मीठ-पाण्याच्या गुळण्या करणे घशातील सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहे.