
1 रक्त आणि सांध्यांमध्ये युरिक ऑसिड साचल्यामुळे सांधेदुखी, सूज आणि चालताना असह्य वेदना होतात. उठणे – बसणे, चालणे-फिरणेही अवघड होते.
2 चुकीची आहारपद्धती, अत्याधिक मद्यपान, शीतपेयांचे जास्त प्रमाण, रक्तदाब वाढणे किंवा औषधांच्या दुष्परिणामांमुळे युरिक ऑसिडचे प्रमाण वाढते.
3 युरिक ऑसिडची पातळी 7mg/dl पेक्षा जास्त झाली तर तत्काळ डॉक्टर किंवा तज्ञांचा सल्ला घ्या; परंतु घरगुती उपायांनीदेखील युरिक ऑसिड नियंत्रणात आणता येते.
4 दुधी भोपळय़ाची साल काढून त्यावर लिंबू चोळा. त्यासोबत एक चमचा अॅलोवेरा व गुळवेलीचा रस, तुळशीची पाने, काकडी, सफरचंद मिक्सरमध्ये वाटून रस काढा.
5 दुधीभोपळय़ाचा ताजा रस युरिक ऑसिड कमी करण्यासाठी अचूक रामबाण उपाय आहे. सकाळी रिकाम्या पोटी रस प्यावा. त्यानंतर एक-दीड तासानंतर नाश्ता करा.




























































