
दारूच्या नशेत कोण काय करेल याचा काही नेम नाही. मात्र दारू ढोसलेल्या एका तरुणाचा प्रताप सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या दारुडय़ाने गळय़ात भलामोठा अजगर गुंडाळला आणि त्याला खांद्यावर घेऊन गावभर हिंडला. अजगर हा विषारी नसला तरी त्याच्यात भक्षाला वेढा घालून श्वास रोखण्याची ताकद आहे. त्यामुळे अजगराने त्याचा फास आवळला असता तर त्या तरुणच जीव धोक्यात आल्याचा अंदाज सर्पमित्रांनी वर्तवला आहे. हा व्हिडीओ rebellious 2.0 या ‘एक्स’ पोस्टवरून व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी एकच संताप व्यक्त केला आहे.





















































