मोबाईलवरील गाणी बंद करण्याच्या वादातून गॅस सिलेंडरने हल्ला, तरुणाचा चेहरा फोडला; आरोपी फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
AI Generated Photo

मोबाईलमध्ये लावलेली गाणी बंद करण्याच्या वादातून आरोपीने 5 किलोचा गॅस सिलेंडर तोंडावर मारून 19 वर्षीय तरुणाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. मोकरम झराईल आलम अली असे आरोपीचे नाव असून, शौकत शमी हैदर रजा असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना महाड येथील बिरवाडी शहरातील भैरवनाथ नगर येथे घडली.

बिरवाडी शहरातील भैरवनाथ नगर येथे आरोपी, फिर्यादी आणि जखमी हे तिघेजण मूळचे बिहार येथील रहिवासी असून कामानिमित्त महाड तालुक्यातील बिरवाडी परिसरात एकत्र राहत होते. एकत्र राहत असताना आरोपीने मोबाईलमध्ये आपली आवडीची गाणी लावली. त्यावर फिर्यादी आणि जखमी या दोघांनी मोबाईलवरील गाणी बंद करण्यास सांगितले. मात्र, या गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने आपल्या घरातील 5 किलो वजनाचा भारत गॅस सिलेंडर जखमीच्या कपाळावर आणि तोंडावर मारून त्याला गंभीर जखमी केले.

जखम गंभीर असल्यामुळे संबंधित व्यक्तीला महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी मोकरम झराईल आलम अली याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.