‘तू क्युट दिसतेस’ राइडनंतर रॅपिडो चालकाचा तरुणीला मेसेज, कंपनीची जाहीर माफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाईन बाईक-टॅक्सी सेवा देणाऱ्या रॅपिडो संदर्भात प्रवाशांच्या गोपनीयतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. इंस्टाग्रामवरील अनुश्का नावाच्या एका युजरने शेअर केलेल्या पोस्टनंतर हा मुद्दा चर्चेत आला असून सोशल मीडियावर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, रॅपिडोची राइड पूर्ण झाल्यानंतर संबंधित रायडरने तिच्याशी थेट व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला. गंतव्यस्थानी सोडल्यानंतरही त्याने तिला मेसेज केला. मी तुला आताचं सोडलं, ‘तू क्युट दिसतेस,  उद्या भेटशील का अशी विचारणा त्या रायडरने त्या तरुणीला केला. तेव्हा तिने रागावून तुला काय करायचं असा प्रश्न विचारला. त्यानंतर अनुकष्काने याचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः रायडरकडे प्रवाशाचा मोबाईल नंबर कसा पोहोचला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे प्रवाशांच्या डेटाच्या सुरक्षिततेबाबत आणि सेवा पुरवठादारांच्या जबाबदारीबाबत चर्चा रंगली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर रॅपिडोकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. कंपनीने कमेंट सेक्शनमध्ये उत्तर देत संबंधित घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून अशा प्रकारचे वर्तन अस्वीकार्य असल्याचे स्पष्ट केले. तसेच संबंधित “कॅप्टन”चे वर्तन सेवा नियमांचे उल्लंघन असल्याचेही नमूद करण्यात आले.

कंपनीने पुढे सांगितले की, या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित प्रवाशाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि राइड आयडी थेट संदेशाद्वारे (डायरेक्ट मेसेज) शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून योग्य ती कठोर कारवाई करता येईल.


 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anushka_Official☀️ (@aanu_shka3)