आसाममध्ये पावसाचा कहर; शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसामध्ये गेल्या काही तासांपासून सुरु असलेला पाऊस थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. गुवाहाटी शहरात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. रविवारी रात्रीपासून गुवाहाटीच्या काही भागांमध्ये झालेल्या, मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे, प्रशासनाने आज म्हणजेच २० एप्रिल रोजी सरकारी आणि खाजगी शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाचा हा आदेश शहरातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना लागू असणार आहे.

मुसळधार पावसानंतर गुवाहाटीसह अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे हातीगाव, अनिल नगरसह अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.