हे करून पहा – दूध आणि मखाणा देईल भरपूर ऊर्जा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होते. याशिवाय थकवा देखील जाणवतो. त्यामुळे ऊर्जा मिळविणे आणि थकवा घालवण्यासाठी दूध आणि मखाण्याची जोडी फार उपयुक्त ठरू शकते.

दूध आणि मखाण्यात कॅल्शियम भरपूर असते. मात्र, थकवा तसेच अशक्तपणावर दुधात मखाणे टाकून किंवा त्याची पावडर टाकून घेतल्यास फायदा होतो. हाडांसोबत मांसपेशींची वाढ चांगली होते, तसेच ते मजबूत होतात.

एक पेला दूध 8-10 मखाणे घालून उकळून घ्या. त्यात चवीसाठी थोडा मध किंवा गूळ घालू शकता.