
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर ः द रिव्हेंज’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला आहे. या चित्रपटाने चार आठवडे पूर्ण केले आहेत. 28 दिवसांनंतर या चित्रपटाची देशातील निव्वळ कमाई 1,099.72 कोटी रुपये झाली आहे, तर एकूण कमाई 1,316.45 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मात्र असे असले तरी ‘पुष्पा-2’ झुकेगा नहीं म्हणत अजूनही पहिले स्थान टिकवून आहे. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा-2’ चा विक्रम मोडायला रणवीर सिंगच्या चित्रपटाचे 135 कोटी रुपयांचे कलेक्शन होणे बाकी आहे.





























































