महिलांना लग्नासाठी सोने आणि दरमहा 2500 रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामीळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता विजय यांच्या ‘तमिळगा वेट्टी कड़गम’ पक्षाने गुरुवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. विजय यांनी मोफत गॅस सिलिंडरपासून लग्नासाठी सोन्यापर्यंत आणि पदवीधर तरुणांना आर्थिक मदत अशी मोठमोठी आश्वासने दिली आहेत. विजय यांनी आपल्या जाहीरनाम्यात महिला वर्गाला केंद्रस्थानी ठेवले आहे. 60 वर्षांखालील महिलांना दरमहा 2,500 रुपयांची मदत, प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 6 मोफत गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे.