सौरभ मते पहिल्यांदाच उपांत्य फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

60 व्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत मुंबईच्या सौरभ मतेने तीनपर्यंत रंगलेल्या लढतीत पुण्याच्या अनिल मुंढेवर 19-21, 25-15 व 22-17 असा चुरशीचा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर पुण्याच्या अभिजीत त्रिपणकरने जगज्जेत्या प्रशांत मोरेला धक्का देत आपली आगेकूच कायम राखली. तसेच झैद फारुकी, संदीप दिवे यांनीही संघर्षपूर्ण लढतीत विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. सौरभने अनिल मुंढेविरुद्धचा पहिला सेट सौरभने केवळ दोन गुणांच्या फरकाने गमावला होता, परंतु दुसऱ्या सेटमध्ये त्याने बरोबरी साधली आणि तिसरा सेटमध्ये सातव्या बोर्डनंतर 17-17 अशा बरोबरीत असताना त्याने ब्रेकचा फायदा उठवत 22-17 असा सेट आणि सामना  जिंकला.