
गोव्यातील अश्वेम बीचवरील एका रिसॉर्टला भीषण आग लागल्याने सर्वत्र घबराट पसरली. ही घटना आजोबा मंदिराच्या जवळ घडली. आगीच्या ज्वाळा वेगाने पसरताच, अग्निशमन दलाची अनेक वाहने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले असून, या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे वृत्त टीव्ही 9 मराठीच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
ही घटना गुरुवारी रात्री ८:४५ च्या सुमारास त्या भागातील ‘आजोबा मंदिरा’जवळ घडली. त्यानंतर रिसॉर्टमधील पर्यटकांनी घटनास्थळावरून पळ काढला.





























































