
राज्याच्या विविध भागात एकीकडे उष्णतेची लाट पसरली असताना दुसरीकडे राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा झपाटय़ाने खालावत चालला आहे. सध्याच्या घडीला राज्यातल्या सुमारे तीन हजार लहान मोठय़ा आणि मध्यम आकाराच्या धरणांमध्ये मिळून 46. 28 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्यावर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमध्ये केवळ 39.32 टक्के इतक्या पाणीसाठा होता.
राज्याच्या जलसंपदा विभागाने राज्यातील धरणांमधील पाणीसाठय़ासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील 3028 धरणांमध्ये एकूण 18,903 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अमरावती जिह्यात सर्वाधिक पाणीसाठा असल्याचे दिसून आले असून अमरावती जिल्ह्यातील 276 धरणांमध्ये 53.65 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची आकडेवारी आज जाहीर करण्यात आली.






















































