आता ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट होणार नाही, अक्षय कुमारने स्पष्टच सांगितले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘हेरी फेरी’ या चित्रपटातील परेश रावल यांचे बाबू भैय्या हे पात्र चांगलेच गाजले. पहिल्या दोन भागांमधील इतर कलाकारांपेक्षा बाबू भैय्या या पात्राने चांगलाच भाव खाल्ला होता. दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा २००० सालचा चित्रपट ‘हेरा फेरी’ आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या विनोदी चित्रपटाने अनेक पिढ्यांचे मनोरंजन केले. निर्मात्यांनी चित्रपटातील मूळ कलाकारांसह—अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल ‘हेरा फेरी ३’ ची घोषणा केली होती. सर्वजण या प्रोजेक्टबद्दल खूप आनंदी होते आणि एकत्र काम करण्यास उत्सुक होते. मात्र, आता ते खूप कठीण वाटत आहे.

आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार, बऱ्याच काळापासून ‘हेरा फेरी ३’ रद्द झाल्याच्या, पुढे ढकलल्या गेल्याच्या आणि कलाकार व दिग्दर्शक यांच्यातील मतभेदांच्या बातम्या येत होत्या. यासंदर्भात कायदेशीर प्रकरणेही सुरू आहेत.

दरम्यान, अक्षय कुमारने आता पुष्टी केली आहे की कायदेशीर प्रकरणांमुळे ‘हेरा फेरी ३’ बनणार नाही. शुभंकर मिश्रा याच्या पाॅडकाॅस्टमध्ये बोलताना अक्षय कुमार म्हणाला, ‘हेरा फेरी ३ हा चित्रपट आता बनवला जाणार नाही. हे ऐकल्यावर मला स्वतःलाच धक्का बसला. काही गोष्टी घडतात, याबद्दल मी कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नाही.’ अनेक गोष्टी, करार आहेत, त्यामुळे हा प्रकल्प रखडला होता.’

राजू, श्याम आणि बाबूराव यांना मोठ्या पडद्यावर परत पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतानाच, ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट होणार नसल्याने, चाहतेही निराश झाले आहेत.