हा 16 नंबर 16 महिन्यांत पंतप्रधान मोदींना घरी पाठवणार, संजय राऊत यांचे सूचक विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जसं आपण म्हणतो सोळावं वरीस धोक्याचं, तंस भविष्यातलं राजकारणाचं 16 आकडा धोक्याचा आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच हा 16 नंबर 16 महिन्यांत पंतप्रधान मोदींना घरी पाठवणार असे सूचक विधानही संजय राऊत यांनी केले.

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, जसं आपण म्हणतो सोळावं वरीस धोक्याचं, तंस भविष्यातलं राजकारणाचं 16 आकडा धोक्याचा आहे. राहुल गांधी यांनी जे संकेत दिले ते योग्य आहेत. 16 क्रमांक हा फार मोठे रहस्य आहे. आणि हा 16 नंबर 16 महिन्यांत पंतप्रधान मोदींना घरी पाठवणार.

संजय राऊत यांनी आपल्या एक्सवरी पोस्ट मध्ये म्हटले होते की,

राहुल गांधींनी लोकसभेत 16 आकड्याचे कोडे घातले, व ते निघून गेले! संपूर्ण भाजपा कोडे सोडवीत बसली असेल!
या कोड्याचा थोडा भाग सांगतो: 16 Epstein फाइल्स US DOJ वेबसाइटवरून (डिसेंबर 2025 च्या बॅचमध्ये) गायब झाल्या. त्या फाईल्स मध्ये काय आहे?
Adani SEC US फ्रॉड केसची तक्रार: पेज 16 ऑफ 39मध्ये Sagar Adani चे नाव स्पष्टपणे घेतले आहे आणि सोलर ब्रायबरी स्कीम चा तपशील दिला आहे (नोव्हेंबर 2024 मध्ये दाखल).
Adani इंडिक्टमेंट टाइमलाइन: मुख्य भ्रष्टाचाराची घटना 16 डिसेंबर 2021 रोजीची (Gautam Adani आणि Sagar Adani विरुद्ध US चार्जेस).
16 मार्च 2017 Epstein मेसेजेस (Ambani-Epstein फाइल्स): Anil Ambani ने Epstein ला Trump टीम (Kushner/Bannon) सोबत संपर्क साधण्यासाठी मदत मागितली होती, मोदींच्या US भेटीसाठी.
Trump कथितरित्या Epstein फाइल्स + Adani US केसचा वापर Modi वर ट्रेड डील साठी दबाव म्हणून करत आहे; आता “16” हे या लपवलेल्या फाइल्स/केसेसचे कोड असल्याची चर्चा आहे.
(या शिवाय या 16 फाईल्स मध्ये बरीच रहस्य आहेत)