
आपटा गावाजवळील दांड-आपटा रोडवरील अवघड वळणावर दुचाकी घसरल्याने भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर कोसळले. मात्र त्यावेळी आलेल्या टेम्पोने अजय कातकरी या तरुणाला तीन किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. हा अपघात इतका भीषण होता की तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर राजेश कातकरी याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कातकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
उरणच्या डाऊर-नगर येथील राहणारा राजेश कातकरी हा आजग्यासह दुचाकीवरून रसयनी येथे आयोजित हळदीच्या कार्यक्रमासाठी निघाला होता. तो दोघे आपटा-दांडफाटा रोडवरील आपटा गावाजवळील अवघड वळणावर आले असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरली. दोघे दुचाकीवरून रस्त्यावर कोसळले. त्यावेळी आलेल्या टेम्पोने अजयला फरफटत नेले. गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. राजेशच्या डोक्याला, हाताला दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टेम्पोचालक फरार
अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी रसयनी पोलीस ठाण्यात टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. याचा अधिक तपास रसयनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव करत आहेत.






























































